'कोरोना ला लाइटली घेऊ नका


पुणे, (प्रतिनिधी) सरकारने बजावूनदेखील युरोप आणि अमेरिकेतील नागरिकांनी कोरोनाला लाइटली घेतलेसरकारने घरामध्ये राहण्याच्या सूचना देऊनही तेथील लोकांनी घराबाहेर पडून समुद्रकिनारी तसेच इतर पिकनिकच्या ठिकाणी गर्दी केली. त्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. हिंदुस्थानामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोरोनाला लाइटली घेऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ अस्थी शल्यचिकित्सक डॉ. के. एच. संचेती यांनी केले आहेसध्या जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. संचेती यांनी लोकांना घरामधून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. कोरोना या संकटाचे गांभीर्य न ओळखता युरोप आणि अमेरिकेतील लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन केले नाही. सुट्टी मजेत घालविण्यासाठी समुद्रकिनारी आणि पर्यटनस्थळी गर्दी केली. तेथे झालेल्या गर्दीमुळे विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला. त्याचा परिणाम आज ते देश भोगत आहेत. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये येऊ नये, यासाठी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पद नका असे आवाहन डॉ संचेती यांनी केले आहे पड़ नका, असे आवाहन डॉ. संचेती यांनी केले आहे.